Motorola Razr 50 Ultra Saam Tv
बिझनेस

Motorola चा नवीन फोल्डेबल फोन लवकरच होणार लॉन्च, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Upcoming Smartphone: आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी मोटोरोला लवकरच आपला नवीन फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Motorola Razr 50 Ultra:

आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी मोटोरोला लवकरच आपला नवीन फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जो Razer 50 Ultra (Motorola Razr 50 Ultra) या नावाने सादर केला जाऊ शकतो. हा फोन Razr 40 Ultra चा अपडेटड व्हर्जन असे, असे बोलले जात आहे. अलीकडेच हा आगामी फोन युरेशियन इकॉनॉमिक कमिशन (EEC) सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. ज्यामुळे तो लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा वक्त केली जात आहे.

सध्या या आगामी स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. वेबसाइटने या फोनचे नावही अद्याप उघड केलेले नाही. मात्र आत्तापर्यंत यांच्याबाबतीत अनेक लीक्ससमोर आले आहे. यानुसार, हा आगामी फोन Motorola Razr 50 Ultra असू शकतो. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोटोरोलाचा हा आगामी स्मार्टफोन मॉडेल क्रमांक XT2453-1 सह EEC वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. जो मागील वर्षीच्या Motorola Edge 40 Ultra च्या मॉडेल क्रमांकाप्रमाणे आहे. यासोबतच 'मोटोरोला ग्लोरी' कोडनेम असलेल्या डिव्हाईसचाही खुलासा नुकत्याच समोर आलेली एका रिपोर्टमध्ये झाला आहे. याचे लीक केलेले रेंडरही समोर आले आहे. ज्यामध्ये मोटोरोला आपल्या नवीन फ्लिप स्मार्टफोनवर काम करत असल्याचे संकेत देण्यात आले होते.  (Latest Marathi News)

मोटोरोलाचा हा आगामी स्मार्टफोन मॉडेल क्रमांक XT2453-1 सह EEC वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. जो मागील वर्षीच्या Motorola Edge 40 Ultra च्या मॉडेल क्रमांकाप्रमाणे आहे. यासोबतच 'मोटोरोला ग्लोरी' कोडनेम असलेल्या डिव्हाईसचाही खुलासा नुकत्याच समोर आलेली एका रिपोर्टमध्ये झाला आहे.

Motorola Razr 40 Ultra स्पेसिफिकेशन

Motorola Razr 40 Ultra मध्ये 6.9-इंचाचा फोल्डेबल poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 165 Hz रिफ्रेश रेटसह येतो. यासोबतच याला फुलएचडी+ रिझोल्यूशन देण्यात आले आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 3.6 इंचाचा POLED डिस्प्ले पॅनलही दिला आहे. ज्याचा स्क्रीन रिफ्रेश रेट 144 Hz आहे आणि रिझोल्यूशन 1056×1066 पिक्सेल आहे.

मोटोने या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला आहे. जो 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेजने सुसज्ज आहे. यात 12 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात 3800mAh बॅटरी आहे. जी 30W वायर्ड आणि 8W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT