FD Calculation saam tv
बिझनेस

FD Calculation: महिन्याला ₹१०,००० हजाराचं व्याज हवयं? वाचा एफडीचं कॅलक्युलेशन

Fixed Deposit Guide: महिन्याला १० हजार रुपयांचे ठराविक व्याज मिळवण्यासाठी किती FD करावी लागेल? तसेच कर आणि टीडीएसचे नियम काय आहे? याबद्दल पुढील माहिती जाणून घेणार आहोत.

Sakshi Sunil Jadhav

महिन्याला एखादी ठराविक रक्कम मिळवण्यासाठी आजही अनेक जण फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीत पैसे गुंतवतात. रियाटरमेंटनंतर व्यक्ती आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणारे गुंतवणूकदार बाजारातील चढ-उतारांचा धोका टाळण्यासाठी बँक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. एफडीमधून दर महिन्याला ठराविक व्याज मिळतं घरखर्चासाठी स्थिर उत्पन्नाचा हा एक सोपा पर्याय आहे.

जर तुम्हाला एफडीमधून दर महिन्याला 10 हजार रुपये व्याज हवं असेल, तर वर्षभरात एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचं व्याज मिळणं आवश्यक आहे. बँका तुम्हाला नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीचा ऑप्शन देतात, त्यामुळे व्याज दर महिन्याला, तिमाही किंवा सहामाही स्वरूपात थेट तुमच्या खात्यात जमा होतो. यामध्ये रक्कम कायम तशीच राहते आणि फक्त व्याजाचा लाभ गुंतवणूकदाराला मिळत राहतो.

एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरानुसार गुंतवणुकीची रक्कम बदलते. जर बँक 6 टक्के व्याजदर देत असेल तर दरमहा 10 हजार रुपये मिळवण्यासाठी सुमारे 20 लाख रुपयांची एफडी करावी लागेल. 7 टक्के व्याजदर असेल तर जवळपास 17.14 लाख रुपये गुंतवावे लागतील. 7.25 टक्के व्याजदरावर ही रक्कम सुमारे 16.55 लाख रुपये होते. 7.5 टक्के व्याज असेल तर 16 लाख रुपयांची गुंतवणूक पुरेशी ठरू शकते, तर 8 टक्के व्याजदर मिळेल सुमारे 15 लाख रुपयांच्या एफडीमधून महिन्याला 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकतं.

सध्या एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांसारख्या मोठ्या बँका 6 ते 7.25 टक्क्यांदरम्यान एफडी व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत जास्तीचं म्हणजे 0.50 टक्के व्याजाचा लाभ घेता येईल. काही स्मॉल फायनान्स बँका यापेक्षाही अधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

जुन्या करप्रणालीत ज्येष्ठ नागरिकांना सेक्शन 80TTB अंतर्गत बचत खातं आणि एफडीच्या व्याजावर 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. तसेच 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्यावर सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलतीचा लाभ मिळतो.

एफडीवर व्याज ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त झालं तर बँका टीडीएस कापतात. आर्थिक वर्ष 2025 मध्ये सामान्य ग्राहकांसाठी वार्षिक व्याज 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस लागू होतो, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 1 लाख रुपये आहे. पॅन कार्डची माहिती दिल्यावर 10 टक्के टीडीएस कापला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात मृत्यू, गावावर शोककळा पसरली

Summer Wedding Fashion: उन्हाळ्यातील लग्नसराईसाठी काय घालायचा? जड लेहेंगा सोडा, ट्राय करा हे कम्फर्टेबल ड्रेस

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

आणखी एका भोंदू अशोकचे कारनामे, महिलेला लिंबू, जडीबुटी खायला द्यायचा; एकटीला बघून घरात घुसला, मुलाच्या समोरच भयंकर कृत्य

स्पेशल 420 ! पोलीस अधीक्षक कार्यालयातच भ्रष्टाचार; पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT