Retirement Investment Saam Tv
बिझनेस

NPS update : मोदी सरकारचा मोठा निर्णय; NPS मध्ये गुंतवणुकीचे २ नवे पर्याय, नेमका काय होणार फायदा?

National Pension System : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी LC-75 आणि Balanced Life Cycle (BLC) हे दोन नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

Namdeo Kumbhar

NPS Latest Update : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या (CABs) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन गुंतवणुकीसाठी दोन नवीन आणि फायदेशीर फंड निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे (Retirement) नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे. यामुळे गुंतवणुकीत सुरक्षितता आणि वाढ दोन्हीचा समतोल राहतो. हे नवीन २ पर्याय नेमके काय आहेत आणि त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल, ते जाणून घेऊया...

LC-75 (अ‍ॅग्रेसिव्ह फंड) आणि BLC (बॅलन्स्ड फंड) हे दोन नवीन आणि फायदेशीर फंड निवडण्याचा पर्याय दिला. LC-75 मध्ये ७५% पर्यंत इक्विटी (शेअर बाजार) गुंतवणूक करता येते, जी दीर्घकाळात जास्त परतावा देऊ शकते. तर BLC मध्ये (बॅलन्स्ड फंड) ५०% इक्विटी मर्यादा असते आणि ४५ वर्षांनंतर ती हळूहळू कमी होते. ही माहिती अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने दिली आहे. खर्च विभागाने सांगितले की, वित्तीय सेवा विभागाची १३ नोव्हेंबर २०२५ रोजीची अधिसूचना NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने काय सांगितले?

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, या नवीन गुंतवणूक पर्यायांमुळे स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. आता कर्मचारी आपल्या आवडीनुसार भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून आणि स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता पाहून पेन्शनच्या पैशांची गुंतवणूक कुठे करायची, हे ठरवू शकतील. यामुळे कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीचे अधिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांच्यासाठी 'एनपीएस' (NPS) योजना पूर्वीपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. सरकारने सर्व सरकारी विभागांना आणि मंत्रालयांना आदेश दिले आहेत की, त्यांनी आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांना या नवीन नियमांची तातडीने माहिती द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तरूण आपल्या देशाचे भविष्य आहेत, तरी तरुणांवर हल्ला का? - प्रियंका गांधी

Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी संकट! पुढील २ दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Liver Health : सावधान! रोजच्या या सवयी तुमचे लिव्हर शांतपणे करत आहेत निकामी; वेळीच ओळखा धोका

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 5 मिनिटांत बनवा कुरमुरा भेळ

नागपुरात तुफान पाऊस; एक तासात 110 मिलिमीटर पाऊस, 800 विद्यार्थी तीन ते चार फूट पाण्यात अडकले

SCROLL FOR NEXT