Mhada House Application saam tv
बिझनेस

Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरणार? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

Mhada House Application : मुंबईसारख्या महागड्या शहरात घरांचे दर गगनाला भिडलेत, त्यामुळे सामान्य लोकांना या शहरांमध्ये घर घेणं अशक्य असतं. अशा लोकांसाठी म्हाडा आणि सिडकोकडून मी दरात घरं उपलब्ध करून दिली जातात.

Bharat Jadhav

ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून ५ हजार ६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत.

मुंबईसारख्या महागड्या शहरात घरांचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घरं घेणं परवडत नाही. अशा लोकांसाठी म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्था परवडतील अशा दरात घरं उपलब्ध करून देतात. दरवर्षी हजारो अर्जदार या योजनेत अर्ज करतात. मात्र अनेकांची अर्ज बाद होत असतात, त्यामुळे अर्ज करतांना काही काळजी घेणं आवश्यक आहे. चुकीची माहिती त्यात टाकली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

म्हाडासाठी कसा अर्ज करायचा?

अर्जदाराला सर्वात प्रथम म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://lottery.mhada.gov.in भेट द्या.

अर्जदाराला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यात नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि उत्पन्न गटाची माहिती द्यावी लागते.

नोंदणी झाल्यावर लॉगिन करावी लागेल. तेथील योजना निवडावी व अर्ज भरावा.

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराविक अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरा.

सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्यरित्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करावीत.

कोणते कागदपत्रे जमा करावी लागतात?

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) डोमेसाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्रातील स्थायिक असल्याचा पुरावा)

४) उत्पन्नाचा दाखला (संबंधित उत्पन्न गटासाठी)

५) बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट

६) पासपोर्ट साईझ फोटो

७) स्वाक्षरीचा फोटो

महत्त्वाची माहिती: सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF/JPEG स्वरूपात अपलोड करावे. अधिक माहितीसाठी https://lottery.mhada.gov.in येथे भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Don 3 : 'बिग बॉस'च्या विजेत्याला लागली लॉटरी? रणवीर सिंहच्या 'डॉन 3'मध्ये झळकणार

Navi Mumbai: मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटला, नवी मुंबईत भाजप आमदारानेच लावली गुजरातीमध्ये पाटी; मनसे आक्रमक

Airtel Recharge Offer: एअरटेलचा एक रिचार्ज, 5G OTT आणि AI अन् बरंच काही

Kamika Ekadashi 2025: कामिका एकादशीला आज घरामध्ये 'या'ठिकाणी लावा पणती; नकारात्मक उर्जा असल्यास निघून जाईल

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

SCROLL FOR NEXT