Maruti Suzuki India Saam Tv
बिझनेस

Car Discount: मारुती सुझुकीच्या या ५ कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट; जाणून घ्या सविस्तर

Maruti Suzuki Car: प्रत्येकाचे स्वतः चे कार घेण्याचे स्वप्न असते. कार घेताना बजेट ही सर्वात महत्तवाची गोष्ट असते. त्यामुळेच कार कंपन्या नेहमी नवनवीन ऑफर देत असतात. मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही कारवर बंपर डिस्काउंट दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maruti Suzuki Car Discount:

प्रत्येकाला आपले स्वतः ची कार असावी असे वाटते. त्यासाठी लोक खूप मेहनतीने नवीन कार खरेदी करतात. परंतु कार खरेदी करताना बजेट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर्स देत असतात. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मारुती सुझुकीच्या वाहनांवर बंपर सूट मिळू शकते.

फेब्रुवारी महिन्यात कार उत्पादन कंपन्यानी खूप ऑफर्स दिल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला मारुती सुझुकीच्या कारवर ६२ हजार रुपयांपर्यंत मोठी सूट मिळणार आहे. तसेच तुम्हाला एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट मिळणार आहे. या कारच्या किंमती प्रत्येक राज्यानुसार बदलतात. (Latest News)

Maruti Alto K10

Maruti Alto K10 या हॅचबॅक कारवर पेट्रोल व्हेरियंटसह तुम्हाला ६२ हजार रुपयांची सुट मिळणार आहे. ज्यामध्ये ४० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज तर ७ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळू शकते.

Maruti Celerio

मारुतीच्या सेलेरियो कारवर या महिन्यात बंपर डिस्काउंट मिळणार आहे. यात तुम्हाला १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज, ४० हजार रुपये रोख रक्कम तर ६ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे.

Maruti Swift

मारुती स्विफ्ट कारवर तुम्हाला ४२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात २० हजार रुपये एक्सचेंज, १५ हजार रुपये रोख रक्कम तर ७ हजार रुपये कॉर्पोरेट सूट मिळू शकते.

Maruti Desire

मारुती सुझुकी डिझायर कारवर ३७ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यात १५ हजार रुपये एक्सचेंज, १५ हजार रुपये रोख रक्कम तर ७ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो.

Maruti S Presso

Maruti S Presso कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात कारच्या AMT मॉडेलवर ६१ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये १५ हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज, ४० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम तर ६ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

मारुतीच्या या सर्व कारवर फेब्रुवारी महिन्यात ही ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरची किंमत प्रत्येक राज्यानुसार बदलत असते. या कारच्या ऑफरसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डिलरशी संपर्क साधू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT