Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Maharashtra Women Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता १५ ते १७ जुलैदरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. पण सरकारची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातल्या लाखो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ हा महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मिळालेला आहे. तर आता महिलांच्या खात्यात येत्या ३ दिवसांत जून महिन्याचा १५०० रुपये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना होतोच आहे. महिलांना दैनंदिन खर्चासाठी आणि आर्थिक दृष्ट्यासक्षम होण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. दर महिन्याला या योजनेअंतर्गत १५०० रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात पाठवला जातो. तर जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या १५ ते १७ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.

समजा काही तांत्रिक कारणांमुळे १५ जुलैपर्यंत खात्यात पैसे आले नाही, तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी लाभार्थी महिलांना आणखी ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

तर यापुर्वी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रच १७ ते २० मे दरम्यान महिलांच्या खात्यात जमा झाले होते. तर मे महिन्याचा हप्ता हा १५ जून नंतर मिळाला होता. त्यामुळे उशीर झाला तरी पैसे सुरक्षित महिलांना मिळतील अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात जवळपास १ कोटी ७० लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान सरकारने अजून या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियावरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील गर्जना मोर्चाला राज ठाकरे उपस्थित

मोठी राजकीय घडामोड! राहुल गांधींची ताकद वाढली, भाजपविरोधातील लढ्यात आणखी एका पक्षाची साथ, नेमकं झालं काय?

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

SCROLL FOR NEXT