Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana Installment Update : जुलै महिना सुरू झाला तरी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा ₹१५०० हप्ता अद्याप जमा झालेला नाही.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Yojana June installment date : देवेंद्र फडणवीस सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला आहे, पण अद्याप जून महिन्याचा हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, आता या संदर्भात एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली असून, संभाव्य तारीख देखील निश्चित झाल्याचे समजते आहे.

१५ जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

जुलै महिना सुरू झाला असला तरी जून महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या १५ जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा थकीत हप्ता मिळू शकतो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात.

पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय?

जून महिन्याच्या हप्त्याबाबत राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. येत्या काही दिवसांत होणाऱ्या पुढील मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हप्त्यासाठीचा आवश्यक निधी थेट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

१ कोटी ६६ लाख भगिनींना मिळणार लाभ

या योजनेची व्याप्ती प्रचंड मोठी असून राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारकडून निधी जाहीर होताच थेट 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा केले जातील. ईकेवायसीनंतर राज्यातील ८० लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला आहे. जूलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urinary Tract Infection: पावसाळ्यात वारंवार युरीन इन्फेक्शन होतंय? हा 1 देसी नुस्खा करेल तुमचा बचाव

Uddhav Thackeray : "सरकार तरुणाईला घाबरत आहे.." उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, २६ जुलैच्या मोर्चाची केली घोषणा

Spicy Cheesy Maggi Recipe : साध्या मॅगीला द्या लसणाचा तडका, रेसिपीची चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ शहादा शहर कडक बंद

आधार कार्ड हरवलंय? मग घरबसल्या २ मिनिटांत नवीन आधार करा डाऊनलोड

SCROLL FOR NEXT