Madh kendra Yojana Saam Tv
बिझनेस

Madh kendra Yojana: शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी, 'मधकेंद्र योजने'तून सरकार देत आहे भरघोस मदत

Maharashtra Government Scheme: शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी, 'मधकेंद्र योजने'तून सरकार देत आहे भरघोस मदत

Satish Kengar

Madh Kendra Yojana Information in Marathi:

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता :

1) वैयक्तिक मधपाळ : या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.

2) वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) : या योजनेसाठी किमान 10 वी पास, वय वर्षे 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.  (Latest Marathi News)

योजनेची वैशिष्ट्ये :

या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.

अटी व शर्ती :

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (द्वारा – जिल्हा उद्योग केंद्र), प्रशासकीय इमारत समोर, (दूरध्वनी क्रमांक : 02472- 222301) उस्मानाबाद – 413501 ई-मेल आयडी : dviosman@rediffmail.com येथे संपर्क साधवा तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.5, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा, पिन : 412806 (दुरध्वनी : 02168-260264) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT