LPG Price September  saam tv
बिझनेस

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Big LPG Update Before September: सप्टेंबरपासून LPG आणि PNG ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल होऊ शकतात. सिलेंडर दर, LPG e-KYC, सब्सिडी आणि नवीन PNG कनेक्शनवरच्या सवलींबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही LPG किंवा PNG वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिना सुरू होताच LPG आणि PNG ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमती, LPG e-KYC आणि नवीन PNG कनेक्शनशी संबंधित नियम किंवा सवलतींचा थेट परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे गॅस ग्राहकांनी या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार का?

तेल विपणन कंपन्या (OMCs) साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडर तसेच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्टमध्य घरगुती LPG सिलेंडरचे दर स्थिर होते. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत १९२ रुपयांची कपात करण्यात आली होती आणि त्याचा दर २,७३८ रुपये झाला होता. त्यामुळे सप्टेंबरमध्ये घरगुती गॅसच्या दरात कपात होणार की वाढ होणार, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय १ सप्टेंबरल स्पष्ट होईल.

LPG e-KYC साठी आज शेवटची संधी

LPG ग्राहकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक e-KYC महत्त्वाची आहे. दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ ही e-KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी अजून ईकेवायसी केलेली नाही, त्यांनी आजच प्रोसेस पूर्ण करणं योग्य ठरेल. e-KYC ऑनलाइन पद्धतीने किंवा संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन करता येऊ शकते. वेळेत प्रोसेस न केल्याे भविष्यात सब्सिडी किंवा सिलेंडरच्या पुरवठ्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात.

PNG कनेक्नशबाबतही महत्त्वाची योजना

नवीन PNG कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू होण्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नवीन ग्राहकांना रजिस्ट्रेशन किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये सवलत अथवा सोप्या EMI पर्यायांचा लाभ मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Thane : भीषण दुर्घटना! ठाण्यात ५ जणांचा बुडून मृत्यू, पोहायला गेले ते परत आलेच नाहीत

Chutney Recipe : पावसाळ्यात चाखा गावाकडच्या चवीची 'ही' आंबट-तिखट चटणी, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Vastu Tips : तुमचा पूर्ण दिवस जाईल खराब, सकाळी उठल्याबरोबर 'या' ५ गोष्टींकडे पाहू नका

Blood spot in eye causes: डोळ्यात रक्ताची गाठ दिसतेय? जाणून घ्या पांढऱ्या भागावर दिसणारा लाल डाग नेमका कशाचा संकेत

SCROLL FOR NEXT