महत्त्वाची माहिती पाहताच Screenshot घेता? तुमच्या मेंदूसोबत नेमकं काय होतं, जाणून घ्या...

Sakshi Sunil Jadhav

स्क्रीनशॉट

आजकाल आपल्याला दिसणारी कोणतीही महत्त्वाची माहिती, चित्र किंवा संदेशाचा आपण लगेच स्क्रीनशॉट घेतो. स्क्रीनशॉट घेतल्याने ती माहिती कायमस्वरूपी जतन होईल, असा आपला विश्वास असतो.

Screenshot Addiction

स्मरणशक्ती

मात्र एका नवीन अभ्यासाने याच्या अगदी उलट गोष्ट उघड केली आहे. या संशोधनानुसार, वारंवार स्क्रीनशॉट घेण्याच्या सवयीमुळे आपली स्मरणशक्ती प्रत्यक्षात कमकुवत होत आहे.

Screenshots and Memory

संशोधन

हे संशोधन अमेरिकेतील बिंगहॅमटन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे. संशोधकांना असे आढळून आले की, फोटो किंवा स्क्रीनशॉट काढण्याच्या सवयीमुळे स्मरणशक्ती सुधारण्याऐवजी ती कमकुवत होते.

Screenshot Memory

फोटो-टेकिंग इम्पेअरमेंट इफेक्ट

संशोधकांनी या स्थितीला 'फोटो-टेकिंग इम्पेअरमेंट इफेक्ट' असे नाव दिले आहे. जी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा फोटो काढते तिला त्या गोष्टीबद्दल केवळ काळजीपूर्वक पाहून पुढे जाणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत तितकेसे आठवत नाही.

Screenshot Memory

छायाचित्रे

या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना चित्रे आणि रेखाचित्रांसह छायाचित्रे दाखवण्यात आली. त्यांना काही कलाकृतींचे स्क्रीनशॉट घेण्यास सांगितले, तर इतर कलाकृतींचे फक्त निरीक्षण केले.

Memory Loss

प्रश्न

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्या कलाकृतींबद्दल सविस्तर प्रश्न विचारण्यात आले. निकालांवरून असे दिसून आले की, ज्या छायाचित्रांचे त्यांनी स्क्रीनशॉट घेतले होते, त्यांबद्दल विद्यार्थ्यांना कमी आठवले.

Memory Loss

फोटो

तर ज्या कलाकृतींचे त्यांनी फोटो न घेता केवळ निरीक्षण केले होते, त्यांमधील तपशील अधिक अचूक होता.

Weak Memory

NEXT : अर्धा लिंबू उरलाय? फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी 'ही' सोपी ट्रिक करा, अनेक दिवस राहील ताजा, रसही आटणार नाही

Lemon Storage In Fridge
येथे क्लिक करा