Big Changes from 2 May 2026  GOOGLE
बिझनेस

LPG New Rules : ...तर तुमचं LPG कनेक्शन होईल बंद; सरकारचे नवे नियम लागू, हे महत्वाचं काम झटपट कराच

LPG New Rules 2026: सरकारने LPG संदर्भात काही महत्वाचे नियम लागू केले आहेत. त्यामध्ये e-KYC आधार लिंक आणि OTP व्हेरिफिकेशन बंधनकारक केलं आहे. नियमांचं पालन केलं नाही तर तुमचं गॅस कनेक्शन बंद होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्या LPG चे दर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. इतकंच नाहीतर LPG सिलेंडर बूक केल्यानंतर तुम्हाला तो २५ ते ४० दिवसांनी मिळेल असा नवीन नियम लागू केला. यात आणखी महत्वाचे बदल सरकारने केले आहेत. ते जर तुम्ही केले नाहीत तर LPG कनेक्शन होईल बंद होण्याची शक्यता आहे. हा नियम १ मे २०२६ पासून जगभरात लागू करण्यात आला आहे.

LPG चा नवा नियम काय

नुकताच सरकारने डबल गॅस कनेक्सशन बाबतीतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडे LPG गॅस कनेक्शन आहे आणि तुमच्या घरात किंवा जवळच्या परिसरात गॅसची पाईपलाईन असेल तर तुम्हाला LPG सिलेंडर सरेंडर करावा लागेल. नाहीतर तुम्हाला गॅस सप्लाय होणार नाही. हा नियम १ मे पासून लागू करण्यात आला आहे.

समस्येवर उपाय काय?

नवीन नियमांनुसार, प्रत्येक LPG वापरणाऱ्याने e-KYC व्हेरिफिकेशन पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे. ज्यांनी अजून आधारची लिंक केलं नाही, किंवा केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना सिलेंडर मिळताना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. तसेच बऱ्याच शहरांमध्ये OTP वर सिलेंडरची डिलिव्हरी सिस्टीम सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये गॅस सिलेंडर मिळवताना तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP देणं अनिवार्य असणार आहे.

या नागरिकांना सिलेंडर नाही

ज्या ग्राहकांनी जून 2025 पूर्वी शेवटचा सिलेंडर रिफिल केलाय, त्यांना 'इनअॅक्टिव्ह' युजर म्हणून ग्राह्य धरलं जाईल. अशा ग्राहकांनी तातडीने e-KYC पूर्ण करणं गरजेचं आहे. नाहीतर नवीन सिलेंडर बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. हे नियम लागू झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर अचानक गॅस सेवा बंद होऊ शकतात. सबसिडी मिळणाऱ्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमचं आधार लिंक आहे का, e-KYC पूर्ण आहे का आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का, हे लगेच तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT