LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: केंद्राची महिलांसाठी खास योजना! महिन्याला मिळणार ७००० रुपये; विमा सखी योजना नक्की आहे तरी काय?

LIC Vima Sakhi Yojana: केंद्र सरकारने महिलांसाठी खास एलआयसी विमा सखी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी खास वीमा पॉलिसी राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळतील. या योजनेचे नाव वीमा सखी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. या योजनेत महिलांना कामासोबत त्याचा चांगला मोबदलादेखील मिळणार आहे. (LIC Vima Sakhi Yojana)

एलआयसी विमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनवण्यासाठी तसेच ग्रामीण भागात विमाबाबत जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेत महिलांना विमा सखी म्हणून काम दिले जाते.या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. १०वी पास महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत महिलांना नागरिकांच्या मनात विमाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे. (LIC Vima Sakhi Yojana For Women)

या योजनेत महिलांना पॉलिसी विक्री केल्यानंतर कमिशन दिले जाते. तसेच तीन वर्षांसाठी एक निश्चित रक्कम दिली जाणार आहे. महिलांना पहिल्या वर्षी दर महिन्याला ७००० रुपये दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी ६००० रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जाणार आहे. याशिवाय महिलांनी जास्तीत जास्त सेल केल्यावर त्यांना चांगले कमिशनदेखील दिले जाणार आहे.

एलआयसी विमा सखी योजनेत एजंटसाठी ट्रेनिंग दिले जाईल. महिलांना तीन वर्षांसाठी ट्रेनिंग आणि मदत केली जाईल.यानंतर महिलांना काम दिले जाईल. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT