LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

LIC Saral Pension Yojana: एलआयसी सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करायची असते. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला १२००० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी फार पूर्वीपासूनच गुंतवणूक करतात. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण नको असेल तर काही गुंतवणूक आतापासून सुरु करा. तुम्ही एलआयसी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला १२००० रुपये मिळतील.

LIC सरल पेन्शन योजना हा रिटायरमेंट प्लान आहे. या योजनेत फक्त तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची असते.या योजनेत तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक करणार तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळणार आहे. (LIC Saral Pension Yojana)

एलआयसी सरल पेन्शन योजनेत जर तुम्ही पीएफ फंडमधील पैसे जमा केलेत तर तुम्हाला आयुष्यभर पैशांची चणचण भासणार नाही. तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल.

LIC सरल पेन्शन योजना

एलआयसीच्या या योजनेत ४० पेक्षा कमी वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त ८० वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर महिन्याला १००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करायची आहे. (LIC Saral Pension Yojana)

एलआयसी सरल पेन्शन योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी १२ हजार रुपयांची अॅन्युटी खरेदी करु शकतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात.या योजनेत तुम्ही मासिक, तीन महिन्याला, वार्षिक आणि सहा महिन्यांनीदेखील पेन्शन मिळवू शकतात.जर ४२ वर्षीय व्यक्ती ३० लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी करतात तर त्यांना प्रत्येक महिन्याला १२,३८८ रुपयांची पेन्शन मिळणार आहे. (LIC Scheme)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT