Lic Jeevan Anand Scheme Saam tv
बिझनेस

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा

Lic Jeevan Anand Scheme: एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत रोज ४५ रुपये गुंतवून तुम्ही ४५ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत गुंतवणूकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात आर्थिक चणचण भासत नाही. तुम्ही एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतात. एलआयसी जीवन आनंद पॉलिसीत तुम्हाला रोज फक्त ४५ रुपये गुंतवायचे आहेत. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहेत. (LIC Jeevan Anand Policy)

जीवन आनंद पॉलिसी हा गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय आहे. ही एक टर्म पॉलिसी आहे. यात योजनेत तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफीटदेखील मिळते. या योजनेत कमीत कमीत १ लाख रुपये एश्योर्ड असतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. (LIC Scheme)

एलआयसी जीवन आनंद (LIC Jeevan Anand Policy) पॉलिसीत दररोज ४५ रुपये गुंतवायचे आहेत म्हणजे महिन्याला १३५८ रुपये गुंतवायचे आहेत. जर तुम्ही दर महिन्याला १३५८ रुपये गुंतवले तर तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहेत. ही एक बचत योजना आहे. या योजनेत तुम्हाला ३५ वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर २५ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला वर्षाला १६,३०० रुपये गुंतवावे लागणार आहेत.

या योजनेत तुम्ही जर ३५ वर्षांसाठी रोज ४५ रुपये गुंतवले तर तुम्ही ५,७०,५०० रुपये गुंतवणार आहात. यात पाच लाख रुपये एश्योर्ड असणार आहेत. ज्यात तुम्हाला मॅच्युरिटी पीरियडनंतर ८.६० लाखांचा रिविजनरी बोनस मिळणार आहे तर ११.५० लाख रुपये फायनल बोनस म्हणून मिळणार आहेत. या पॉलिसीत दोनदा बोनस मिळतात. या योजनेत बोनस मिळण्यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असायला हवी.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीत तुम्हाला टॅक्स सूट देखील मिळते. तसेच या योजनेत ४ प्रकारचे रायडर्स असतात. अपघाती मृत्यू, अंपगत्व, अपघात बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्श्युरन्स रायडर यांचा समावेश आहे. या योजनेत तुम्हाला अशा परिस्थितीत पैसे मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT