Petrol Diesel Rate (1st April 2024), Petrol Diesel Price Today 1st April 2024 Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (1st April 2024): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या राज्यातील नवे दर

Petrol Diesel Price Today 1st April 2024 :आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. सरकारी कंपन्यांनी आजच्या म्हणजेच 1 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. सरकारी कंपन्यांनी आजच्या म्हणजेच 1 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. तर काही राज्यांमध्ये किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 83.17 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 86.97 वर व्यापार करत आहे. मागच्या महिन्यात निवडणूकांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केली. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील आजचा भाव

महाराष्ट्रात पेट्रोल ६५ पैशांनी तर डिझेल ६३ पैशांनी महाग झालं. मध्य प्रदेशात पेट्रोल ३१ पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागलं. हिमाचल प्रदेशात पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलं. पंजाबमध्ये पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झालं.

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१५ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०३.८३ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.३७ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.९१ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१. ४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९८ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५४ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ७८ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९०.५४ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT