Lakhpati Didi Yojana Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Yojana: महिला लखपती होणार! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Lakhpati Didi Yojana News: केंद्र सरकारने महिलांसाठी खास लखपती दीदी योजना सुरु केली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या महिलांसाठी आहे. केंद्र सरकारची महिलांसाठी खास लखपती दीदी योजना आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळते. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात.

अनेकांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो. परंतु भांडवल नसल्याने व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येतात. परंतु केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत तुम्ही स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. या योजनेत तुम्हाला ५ लाखांपर्यंत लोन मिळते. या लोनवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. (Government Scheme)

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. त्याचसोबत त्यांच्या बिझनेसला प्रोत्साहन दिले जाते. लखपती दीदी योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगदेखील दिले जाते. यासाठी एक प्रोग्राम राबवण्यात येतो.

या योजनेअंतर्गत महिला स्वतः रोजगारनिर्मिती करतात. त्यामुळे स्वतः सोबत इतर महिलांनादेखील उत्पन्न मिळते.या योजनेत बचत गटातील महिला अर्ज करु शकतात.

२०२३ पर्यंत या योजनेत १ कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत महिलांना स्किल ट्रेनिंगसोबत बिझनेस सुरु करण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. (Lakhpati didi Scheme For Women)

या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. या योजनेत अर्ज करणारी महिला त्या राज्याची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला क्षेत्रीय स्वयं सहायता समूह कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह बिझनेस प्लान सादर करायचा आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रुफ, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागणार आहे. (Lakhpati Didi Scheme Application Process)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT