Lado Protsahan Yojana Saam tv
बिझनेस

Lado Protsahan Yojana: खुशखबर! मुलीच्या जन्मानंतर मिळणार १.५ लाख रुपये; लाडो प्रोत्साहन योजना आहे तरी काय?

Lado Protsahan Yojana for Girls: राजस्थान सरकारने मुलींसाठी लाडो प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना १.५ लाख रुपये मिळतात.

Siddhi Hande

लाडो प्रोत्साहन योजना

मुलींना मिळणार १.५ लाख रुपये

अर्ज कसा करावा?

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही महिला आणि मुलींसाठी योजना सुरु केल्या आहेत. राजस्थान सरकारने मुलींसाठी खास लाडो प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना आर्थिक मदत दिली जाते. मुलींच्या नावावर १.५ लाख रुपये जमा केले जातात. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी ही योजना सुरु केली होती.

२०२४ मध्ये ही योजना सुरु झाली. या योजनेत महिलांना शिक्षणासाठी आणि त्यांना सशक्य बनवण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो ते जाणून घ्या.

लाडो प्रोत्साहन योजना आहे तरी काय? (What is Lado Protsahan Yojana)

लाडो प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारअंतर्गत येणाऱ्या मेडिकल इन्स्टिट्यूशनमध्ये जन्माला आलेल्या मुलींना पैसे दिले जातात. एकूण १.५ लाख रुपये जमा करतात. मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत ७ हप्त्यांमध्ये हे पैसे जमा केले जातात.

७ हप्त्यांमध्ये दिले जातात पैसे

मुलीच्या जन्मानंतर खात्यात ५००० रुपये जमा केले जातात. यानंतर १ वर्षाची झाल्यावर लस घेतल्यानंतक ५००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी पहिलीला गेल्यावर १० हजार रुपये, सहावीला गेल्यावर १५ हजार रुपये आणि मुलगी दहावीला गेल्यावर २० हजार रुपये दिले जातात. मुलगी १२वीत गेल्यावर २५ हजार रुपये दिले जातात. शेवटी मुलीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर खात्यात ७० हजार रुपये जमा केले जातात.

अर्ज कसा करावा?

सरकारी रुग्णालयात मुलींचा जन्म झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड PCTS पोर्टलवर टाकला जाईल.

यानंतर मुलीच्या पालकांना SSO पोर्टल sso.rajasthan.gov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला लाडो प्रोत्साहन योजनेचा फॉर्म भरावा लागेल.

यानंतर जन्मदाखला, कुटुंबाचे आधार कार्ड, डोमिसाइल, बँक अकाउंट ही माहिती भरावी लागेल.

यानंतर फॉर्म भरावा. फॉर्म भरुन झाल्यावर व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्यावर तुम्हाला पहिला हप्ता मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT