Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Maharashtra Budget : लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच, ₹२१०० मिळणार नाहीत

Ladki Bahin Yojana Announcement In Maharashtra Budget: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात होईल, अशी आशा महिलांनी होती. मात्र, लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थमंत्री अजित पवारांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

लाडकी बहीण योजनेसाठी ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षी लाडकी बहीण योजनेसाठी ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही. या वर्षी १२ महिन्यांसाठी फक्त ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३६००० कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांन आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच

यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या पदरात निराशाच पडली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती. मात्र, अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे या वर्षी महिलांना २१०० रुपये मिळणार नाही. पुढच्या ५ वर्षात आता २१०० रुपये मिळणार की नाहीत याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT