Ladki Bahin Yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

Aadhaar Linking : लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी आधार-बँक लिंकिंग आणि NPCI मॅपिंग Active असणं आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेचे पैसे वेळेवर बँक खात्यात जमा व्हावेत, यासाठी फक्त ई-केवायसी पूर्ण असणं पुरेसं नाही. तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक असणं आणि NPCI सर्व्हरवर मॅच असणंही आवश्यक आहे. अन्यथा सरकारी योजनेचा हप्ता जमा होताना अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरून काही मिनिटांत आधार-बँक सीडिंग स्टेटस तपासता येते.

आधार सीडिंग म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

आधार सीडिंग म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे आणि NPCI प्रणालीमध्ये त्याची नोंद करणे. सरकारच्या DBT (Direct Benefit Transfer) प्रोसेसच्या मदतीने योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या आधारशी मॅप असलेल्या बँक खात्यात पाठवले जातात. त्यामुळे तुमचं बँक खातं आधारशी लिंक असण्यासोबतच NPCI मध्ये Active असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर पैसे जमा व्हायला अडचणी येऊ शकतात.

घरबसल्या ५ ते १० मिनिटांत असं तपासा स्टेटस

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला (https://myaadhaar.uidai.gov.in/) भेट द्या. होमपेजवर Login पर्यायावर क्लिक करा. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा Captcha भरा. Send OTP वर क्लिक करा. आधारशी नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर उपलब्ध सेवांमधला Bank Seeding Status हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या आधार-बँक लिंकिंगचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

स्टेटस Active नसेल तर काय करावे?

जर तुमचं Bank Seeding Status Inactive दिसत असेल किंवा बँक खातं लिंक नसल्याचं समजलं, तर संबंधित शाखेत जा. तिथे आधार सीडिंग किंवा DBT फॉर्म मागून तो भरा. आधार कार्डची प्रत जोडून फॉर्म बँकेत जमा करा. काही बँका त्यांच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा नेट बँकिंगमधूनही आधार सीडिंगची सुविधा देतात. पण ही सुविधा उपलब्ध आहे की नाही, हे बँकेकडे तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजा गुपित

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

Maharashtra News Live Update: जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करा; गडचिरोलीत भव्य ओबीसी मोर्चा

Ramayana Movie Advance Booking: दिवाळीपूर्वीच 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका;  ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यावधींचा टप्पा केला पार

SCROLL FOR NEXT