Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मार्चमध्ये १५०० मिळणार की २१००? अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताच लाडक्या बहि‍णींमध्ये चर्चा

Ladki Bahin Yojana March Month Installment Update: लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च महिन्यात १५०० की २१०० मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्च रोजी देण्यात येणार आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या मार्चच्या हप्त्यांबाबत अनेक संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. मार्चचा हप्ता कधी येणार? मार्च महिन्यात १५०० येणार की २१००? अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत घोषणा होणार का असे प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात अर्थसंकल्पात महिलांना २१०० रुपये देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.त्यामुळे मार्च महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे.

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात दिला जाणार असल्याची माहिती ही आदिती तटकरेंनी दिली होती. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेत महिलांना दोन्ही महिन्याचे पैसे येणार आहेत. मात्र, १५०० की २१०० रुपये देणार याबाबत माहिती दिलेली नाही.

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होऊ शकते. जर अधिवेशनात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याची घोषणा झाली तरीही त्याची अंबलबजावणी होण्यासाठी ३-४ महिने लागू शकतात. त्यामुळे कदाचित महिलांना अजून काही महिने वाट पाहावी लागू शकते. दोन- तीन महिन्यानंतर महिलांच्या खात्यात दर महिन्याला २१०० रुपये येण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींमध्ये चर्चा

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता येण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये खूप नाराजी होती. मात्र, आता महिला दिनी महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा केले जाणार आहेत. ८ मार्च रोजी पैसे दिले जाणार आहेत. मात्र, मार्चचा हप्ता महिना अखेरपर्यंत येऊ शकतो, असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी लातूर- अंबाजोगाई महामार्ग अडवला

कल्याणमधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पेटला; पावसाळाच्या तोंडावर ३० हजार नागरिकांचा जीव धोक्यात

महाराष्ट्र ते दिल्ली काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Petrol Price : पेट्रोल - डिझेल २२ रुपयांनी स्वस्त; इंधन टंचाईच्या काळात भारताचा शेजारी देश पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

SCROLL FOR NEXT