Ladki Bahin Yojana SaamTv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: त्या ५ लाख महिलांना पैसे मिळणार की नाहीत? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, या अपात्र महिलांविषयी देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ५ लाख अपात्र महिलांना बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत कोणतेही नवीन कुठलेही निकष लागू करण्यात आले नाही. आम्ही स्वतः हून कोणत्याही महिलांकडून पैसे घेतले नाही. नियमांच्या बाहेर जाऊन कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर तो बंद करण्यात येणार आहे. आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Ladki Bahin Yojana News)

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतः हूनच योजनेचा लाभ घेणे बंद केले, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. त्यातील काही महिलांचे वय ६५ पेक्षा जास्त होते. तर काही महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचा लाभ घेतल होत्या. तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिलांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. सुमारे ५ लाख महिलांना आता या महिन्यापासून लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. त्यात महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही त्याची तपासणी केली जाणार आहे. याचसोबत आयकर विभागाची मदत घेऊन उत्पन्न तपासले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणा क्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT