Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जूनचे पैसे आले, जुलैचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana July Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जूनचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर जुलैचा हप्ता कधी मिळणार अस प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जून महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जून संपून आता जुलै महिना सुरु झाला आहे त्यामुळे जुलैचे पेसे कधी मिळणार असाही प्रश्न महिला विचारत आहेत.

लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana July Month Installment)

जुलै महिना सुरु झाला आहे. दरम्यान, जून आणि जुलैचे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होता. मात्र, जूनच्या हप्त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर जुलैचा हप्तादेखील याच महिन्यात दिला जाईल. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

दर महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबतदेखील घोषणा केली जाईल.

जूनचा हप्ता कोणाला मिळणार? कोणाला नाही?

लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार नाहीये. ज्या लाभार्थ्यांनी नियमाबाहेर जाऊन अर्ज केला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाचीही मदत घेतली आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका; कुर्ला रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत|VIDEO

Maharashtra Live News Update: - ठाणे महापालिका क्षेत्रातील १५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळा विसराल; सांगलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक शांत अन् सुंदर हिल स्टेशन

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

Hukumachi Rani Hee: अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ; 'हुकुमाची राणी ही' मालिकेत लवकरच येणार मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT