Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार मोफत गॅस सिलिंडर; अन्नपूर्णा योजनेबाबत मोठी अपडेट

Mukhyamantri Annapurna Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. गॅस सिलिंडर वितरणाची तारीख समोर आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. आता महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महिलांना कधीपासून २१०० रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरदेखील मिळणार आहे.

महायुती सरकारच्या यशात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडून आल्यावर २१०० रुपये हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. हा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देण्यात येऊ शकतो. (Ladki Bahin yojana Update)

लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, जानेवरी २०२५ मध्ये महिलांना पहिला गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. गॅस सिलिंडरचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. या योजनेच्या अंबलबजावणीमुळे महिलांना महिन्याचा आर्थिक खर्च भागवण्यास मदत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना लवकरच गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच गॅस सिलिंडर मिळणार आहे.या योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर वितरण करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे याबाबत माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल.

लाडकी बहीण योजनेची पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

महिलेचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT