Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे. यानंतर आता लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये मिळतील, अशी आशा लाडक्या बहि‍णींना आहे. याबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय होऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हे आश्वासन दिले होते. दरम्यान, आता अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होऊ शकते.

काही दिवसांपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी २१०० रुपयांबाबत सूचक वक्तव्य केली होती.अर्थसंकल्पात कदाचित २१०० रुपयांची घोषणा होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आदिती तटकरेंनी २१०० रुपयांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. यामुळे लाडक्या बहि‍णींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडकींना यंदा २१०० रुपये मिळणार का?

लाडकी बहीण योजनेत कदाचित २१०० रुपयांनी घोषणा होऊ शकते. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यात लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. कदाचित अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा होऊ शकते. जर २१०० रुपये देण्याची घोषणा झाली तर पुढच्या २ ते ४ महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिलांना २१०० रुपये मिळण्याची सुरुवात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

SCROLL FOR NEXT