राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सप्टेंबर महिना संपत आला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला नव्हता. गणेशोत्सवात तसेच गौरी-गणपतीच्या वेळी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असे सांगितले जात होते; परंतु तांत्रिक कारणांमुळे हप्ता वितरणास उशीर झाला. अखेर २४ सप्टेंबर, गुरुवारी राज्य सरकारकडून 'लाडकी बहीण' योजनेच्या हप्ता वितरणासाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आजपासून पैसे खात्यात वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.
फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे ३३९ कोटींचा निधी हस्तांतरित (वर्ग) करण्यात आला आहे. त्यानंतर डीबीटी (DBT) द्वारे खात्यावर पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात पुढील २ ते ३ दिवसांत पैसे जमा होतील. आजपासून पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याची १५०० रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात (DBT द्वारे) ट्रान्सफर होत आहे. पुढील काही तासांतच बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश (SMS) महिलांच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.