Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या महिलांच्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत; अजित पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. आता अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

आता फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार

अजित पवारांची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता लवकरच येणार आहे. यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत अजित पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आता फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार आहेत.

अजित पवार काय म्हणाले? (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana)

अजित पवारांनी सांगितलंय की, आता फक्त सप्टेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसीची मूदत वाढवून दिली जाईल, परंतु केवायसी करावी लागणारच आहे. त्यामुळे आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावीच लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना पुढचा हप्ता मिळणार आहे.

सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana September Installment Date )

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर दिली आहे. आता आजपासून महिलांच्या खात्यात १५०० रुपये दिले जाणार आहे. आदिती तटकरेंनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार आहे.

केवायसी कशी करावी? (Ladki Bahin Yojana KYC Process)

लाडकी बहीण योजनेची केवायसीची प्रोसेस ऑनलाइन होणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील. यानंतर तुम्हाला आधार नंबरशी लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT