Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद होणार, सरकारने पुन्हा सुरु केली पडताळणी

Ladki Bahin Yojana These Women Will Not Get Money: लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाहीये. आता सरकारने पुन्हा पडताळणी सुरु केली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लाडकी बहीण योजनेतून अजून काही लाभार्थ्यांचे अर्ज वगळले जाणार आहे. आता लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील तीन किंवा चार महिला लाभ घेत असेल तर त्या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. एकाच कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु असं असतानाही दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाही

काही महिलांनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे सांगताना वयोगटात न बसतानाही तसे दाखवून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे.

आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्यासाठी एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारुन योजनेचा लाभ बंद केला जात आहे.

दहा लाभ महिलांचे लाभ बंद (10 Lakh Women Wont Get Benefits)

याचसोबत अनेक महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या महिलांच्याही अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे.

प्राप्तिकर विभागाद्वारे पडताळणी (Ladki Bahin Yojana Verification)

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील २ कोटी ५७ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेसाठी काही अटी आहेत. यामध्ये एका कुटुंबातील फक्त दोन महिलाच योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु अनेक महिलांनी या निकषांबाहेर जाऊन अर्ज केले आहेत.आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून, चारचाकी वाहन असतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनाही योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, याबाबतची माहिती प्राप्तिकर विभाग महिला व बालविकास विभागाला देईल. त्याआधारे पडताळणी केली जाईल.लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत असल्याचेही सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय दिला आहे.दरम्यान, अनेक महिलांना दर महिन्याला लाभ मिळत होता. परंतु हा लाभ अचानक बंद झाल्याने महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील त्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT