Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या महिलांना कधीच मिळणार नाही लाभ, तुमचंही नाव आहे का?

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या योजनेचा लाभ काही महिलांना मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत असतात. लाडक्या बहि‍णींना आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला. त्यानंतर जूनचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यापूर्वी आता काही लाडक्या बहि‍णींना कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे.

या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ (These Women Will not Get Benefit Of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नियम ठरवले आहेत. या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहे. यासाठी पुन्हा पडताळणी सुर करण्यात आली आहे. अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ गेतला आहे. असं लक्षात आल्यावर सरकारने पु्न्हा पडताळणी सुरु केली आहे. यात तब्बल अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतला आहे.

आयकर विभाग करणार तपासणी (Income Tax Department Do Verification)

लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. परंतु अनेक महिलांनी या नियमांचे उल्लंघन करुन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची माहिती सरकारला देणार आहे. यातून ज्या महिला आयकर भरतात, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याचसोबत ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत अशा महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT