Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार ३००० रुपये; तुमचंही नाव आहे का? जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana Women Will Get 3000 Rupees: लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता मे महिन्यात काही महिलांना ३००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. एप्रिलच्या हप्त्यानंतर आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणूकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत काही अंबलबजावणी अजूनही झालेली नाही. दरम्यान, मे महिन्यात आता काही लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये दिले जाणार आहेत.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार ३००० रुपये (These Women Will Get 3000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. तर काही महिलांना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. ज्या लाभार्थी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मे महिन्यात ३००० रुपये जमा मिळण्याची शक्यता आहे. या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाऊ शकतो. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाईल.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा काही कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांना मे महिन्यात ३००० रुपये दिले जाऊ शकतात.

लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana May Month Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो. या योजनेत मे महिन्यातदेखील महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

IND Vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात, कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह सामना?

SCROLL FOR NEXT