Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद ;दर महिन्याला मिळणार नाहीत ₹१५००

Ladki Bahin Yojana These Women will Not Get Benefit From New Year: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षापासून या महिलांना १५०० रुपये मिळणार नाहीत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

या महिलांचा लाभ कायमचा होणार बंद

नवीन वर्षात या महिलांना मिळणार नाहीत ₹१५००

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील काही महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून अनेक लाडक्या बहि‍णींना योजनेतून बाद केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान, ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा होणार बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Will Stopped)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. केवायसीची प्रोसेसे ऑनलाइन आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर लगेच करा.

केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का? (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. जर मुदतवाढ द्यायची असेल तर आज घोषणा होईल. परंतु जर मुदतवाढ झाली नाही तर ज्यांनी केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद केला जाईल.

अपात्र महिलांनाही मिळणार फटका

लाडकी बहीण योजनेत केवायसी करुन अपात्र महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीद्वारे महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. महिलांच्या वडील किंवा पतीचीही केवायसी करायची आहे. याद्वारे त्यांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Benefits: जेवणात लिंबू पिळून खाण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT