Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद, समोर आली अपडेट

Ladki Bahin Yojana These Women Will not Get Benefit: लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे. दरम्यान, आता काही महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाही हप्ता

यापुढचे १५०० रुपये कायमचे बंद होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून हे पैसे जमा झाले आहेत. अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच दिला जाईल. मात्र, लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

या महिलांचा लाभ कायमचा बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करण्याचीही मुदत आता संपली आहे. केवायसीची मुदत संपल्यामुळे आता महिलांना केवायसी करता येणार नाही. कोट्यवधी महिला योजनेचा लाभ घेतात. त्यातील लाखो महिलांनी केवायसी केले नाही. त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वडील किंवा पतीचीदेखील केवायसी करायची असते.या केवायसीमुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. यामध्ये जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतर महिलांची संपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाकडे जाणार आहे. याद्वारे महिलांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीतून ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद होणार आहे.

डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana December Installment Date)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT