Augest installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० 'या' दिवशी जमा होणार? फडणवीस सरकार आज घेणार मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये कधी जमा होणार? आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता आणि निधीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरनंतर पैसे जमा होण्याची शक्यता जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana August ₹1500 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार, याबाबत आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

आज मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांसोबतच 'माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक निधी वर्ग करण्याबाबत आणि लाभाची तारीख निश्चित करण्यावर चर्चा होऊन महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिळणार भेट?

शासकीय निर्णयानुसार (GR) दरमहा १० तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात सन्माननिधीची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता, त्याच धर्तीवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेशोत्सवाच्या काळात (गौरी-गणपती सणा दरम्यान) महिलांना दिला जाण्याची शक्यता आहे.

१६ सप्टेंबरनंतर खात्यात पैसे जमा होणार?

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १६ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात हा सन्माननिधी जमा होणार असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठी आर्थिक भेट मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJP आंदोलन तीव्र करणार

... अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ; महाराष्ट्रातील 'या' गावांचा सरकारला इशारा

हातात हातोडा,पकड आणि दोरी; शिवसेना नेत्याच्या घरात पहाटे तरूण शिरला अन्...पुढे जे घडलं त्याने पोलीसही चक्रावले

Ghee Vs Coconut Oil: तूप की नारळाचे तेल, शरीरासाठी काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Rent House: भाड्याचे घर रिकामं करताय? मालकाला चावी देण्यापूर्वी हे काम जरूर करा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT