Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार नोव्हेंबरचा हप्ता, तुम्ही पात्र आहात का? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana November Installment: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, निवडणूकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी?

फक्त या महिलांनाच मिळणार १५०० रुपये

लाडकी बहीण योजनेची पात्रता काय?

लाडकी बहीण योजनेत आता महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे. नोव्हेंबर महिना अर्धा संपला असूनही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फक्त याच महिलांना मिळणार १५०० रुपये (Only These Women Will Get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ घेत आहेत.यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे लाभ बाद केलेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेतून जवळपास ५० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

पात्रता काय? (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. यामध्ये महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. एकाच कुटुंबातील फक्त एका महिलेलाच योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana November Installment Update)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. या निवडणुका २ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाऊ शकतात.

लाडक्या बहिणींना केवायसीसाठी डेडलाइन

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता केवायसीसाठी डेडलाइन वाढवून दिली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. यासाठी आधी मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत होती. अजूनही १ कोटींपेक्षा जास्त महिलांचे केवायसी बाकी आहे. त्यामुळेच मुदत वाढवून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT