Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती! आतापर्यंत किती पैसे जमा? अजूनही अर्ज करता येणार का?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजना सुरु होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात महिलांना किती पैसे मिळाले याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षी २९ जून रोजी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली होती. या योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. दरम्यान, योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले तसेच योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा झाले? (How Much Money Deposit Till Now Under Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांच्या खात्यात १२ हप्ते जमा झाले आहेत. एका वर्षात १८००० रुपये जमा झाले आहेत. या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळत आहे. अपात्र महिलांना योजनेतून बाद केले जात आहे.

अजूनही अर्ज करता येणार का? (Applications Are Still Open For Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्जप्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करता येणार नाही. तसेच ही अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेचे नियम (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

१८ ते ६० वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो.

लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन नसावे.

महिला सरकारी कर्मचारी नसावी.

लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

SCROLL FOR NEXT