Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होताच आदिती तटकरेंची मोठी घोषणा, पोस्ट करत दिली माहिती

Aditi Tatake On Ladki Bahin Yojana Completion: लाडकी बहीण योजनेला काल २९ जून रोजी वर्षपूर्ती झाली आहे. याच दिवशी आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. २९ जून २०२४ रोजी ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान,आता योजनेला वर्षपूर्ती झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी खास पोस्ट केली आहे. ही योजना अशीच अखंडपणे सुरु राहणार आहे, अशी घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.

आदिती तटकरेंची पोस्ट

आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वात या क्रांतिकारी योजनेची अंबलबजावणी त्याच ताकदीने सुरु आहे. आज या योजनेला वर्षपूर्ती होत आहे.

या योजनेनिमित्त महाराष्ट्राच्या गावागावात फिरले, लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला. या योजनेमुळे महिलांना किती मोठा आधार दिला याची जाणीव झाली. या योजनेच्या रक्कमेतून कोणी मुलांना शिक्षण देत आहे तर कोणी व्यवसाय सुरु केला आहे. अनेक लाडक्या बहि‍णींना एकत्र येत मोठी ताकद उभी केली आहे. या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाची ज्योत घरोघरी नेता आली, ही अभिमानाची बाब आहे. यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहि‍णींचे मनापासून आभार, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरेंची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच जोमाने पुढे अखंडपणे सुरु राहणार, अशा अनेक यशोगाधा महाराष्ट्रातील गावागावात घडवणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे. आता थांबायचं नाय, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे ही योजना आता बंद होणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT