Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: दिवाळीपूर्वी लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ५५०० रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जाणार आहे.

Siddhi Hande

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. १५ ऑक्टोबरनंतर महिलांचे फॉर्म स्विकारले जाणार नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. त्यानंतर आता महिलांना दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिलांनी आज अर्ज करावेत. (Ladki Bahin Yojana Update)

दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी अधिक चांगली होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या शूभमूहूर्तावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ही रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांपेक्षा वेगळी असेल.या योजनेत काही महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहे. दिवाळीआधी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने महिलांनी ही भेट दिली आहे. सरकारने लाडकी बबीण योजनेत लाभार्थ्यांना ३००० रुपये बोनस दिला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना ५ महिन्याचे ७५०० रुपये जमा झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्याच्या उमरी मेघे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार; गृहपालांच्या बदलीची मागणी

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

NHAI मध्ये काम करण्याची संधी; समर इंटर्नशिप सुरु; मिळणार स्टायपेंड; वाचा अर्जप्रक्रिया

Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT