Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

Ladki Bahin Yojana November-December Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा हप्ता उशिरा येण्यामागचे कारण काय आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता कधी येणार?

हप्ता न येण्यामागचे कारण काय?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे पहिले १५ दिवसदेखील संपले आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana November-December Installment)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. २३ आणि २४ डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच २-३ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लाडकीचा हप्ता अजून का आला नाही? (Ladki Bahin Yojana why November Installment Delay)

लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. या कालावधीत योजनेअंतर्गत निधी दिला नाही, असं सांगितलं जात होते. त्यामुळे त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याचसोबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही पैसे जमा होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान,याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दीड वर्षे महिलेवर बलात्कार, ३ वेळा गर्भपात; प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार : मुख्यमंत्री

Sunetra Pawar : फडणवीस हे शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करतील; राऊतांच्या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा

Chhatrapati shivaji maharaj history: प्रतापगडावर मृत्यूपूर्वी अफजलखानाचे शेवटचे शब्द काय होते?

SCROLL FOR NEXT