Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana 4500 Rupees Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तीन महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे ४५०० रुपये एकत्र येऊ शकतात.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

  • नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

  • लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार?

डिसेंबर महिन्याचे पहिले १५ दिवस उलटून गेले तरीही अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. नोव्हेंबरसोबतच आता डिसेंबरचा हप्तादेखील दिला नाही. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता लांबणीव जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा असे तीन महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे.

लाडकीच्या खात्यावर येणार ४५०० रुपये? (Ladki Bahin Yojana Women Will get 4500 Rupees Installment)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच जानेवारीचा हप्तादेखील याचसोबत दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित जानेवारी महिन्यातच हे तिन्ही हप्ते दिले जाऊ शकते. तीन महिन्याचे एकूण ४५०० रुपये एकत्र दिले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडक्या बहि‍णींना पैसे येण्यास उशिर होण्याची कारणे (Ladki Bahin Yojana Installment Delay Reasons)

लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे उशिरा येण्यामागे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या काळात निधी दिला नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर जेव्हा निधी पास होईल, तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT