लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटीच्या घरात आहे. आता या महिलांना योजनेतून मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या जागी आता २१०० रुपये मिळणार आहेत. त्याबाबत सरकारमधील माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय. लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक साहाय्य आता वाढवलं जाणार आहे.
येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पैशाची वाढ केली जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. विशेषत: लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरलीय. घर खर्च चालवण्यासाठी त्यांना मोठं आर्थिक साहाय्य मिळालं.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत. ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरु केली जाणार आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही अर्जदारांची अर्ज बाद करण्यात आली आहेत.
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्ज केल्यानंतरही अनेकांच्या बँक खात्यात पैसे आले नसल्याची तक्रार बहुतेक महिलांनी केली होती. अर्ज करणाऱ्या महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही.
आता तुम्ही म्हणाल, आर्थिक स्थिती चांगली असणं म्हणजे काय? तर जाणून घ्या ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसतो. हा जर अर्ज करणारी महिला शेतकरी असेल आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्या महिलांना योजनेचे पैसे मिळतात. तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
या योजनेचा लाभ बहुतांश ग्रामीण महिलांनी घेतलाय. ग्रामीण भागातील महिलांना पुरेसे बँकेची माहिती नसते. बऱ्याच बहिणी ह्या इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंग करत नाहीत. त्यामुळे बँक खात्यात पैसे आले का नाही हे त्यांना कळत नाही. त्यामुळे पैसे आल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैशांची तपासणी कशी कराल याची माहिती आम्ही आज देत आहोत.
1) योजनेचा नवीन हप्ता पाठवण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला आधी बँकेत जावे लागेल. बँकेत जाऊन काऊंटरवर चौकशी करु शकता. किंवा कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यावर जमा झालेली रक्कम बाबत विचरणा करू शकतात.
2) कोणी ऑनलाईन बँकिंगची सेवा घेत असेल तर बँकेच्या ॲपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करू शकतात. त्यातून तुम्हाला तुमच्या खात्यातील पैशांची माहिती होईल.
3) जर तुमचा मोबाईल नंबर जर आधारकार्ड आणि बॅंक खात्याशी जोडला असेल तर तुम्हाला बॅंकेचा मेसेज येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.