Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: कामाची बातमी! लाडक्या बहिणींना मे-जूनचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ३००० रुपये जमा होणार

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला आहे तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबबातत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नही महिला विचारत आहेत.

मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana May-June Installment Come Together)

मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहेत. त्यातच अनेकजण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहे. याचे कारण असे की, आता मे महिना संपायला फक्त १० दिवस उरले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल.

लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये मिळणार (Ladki Bahin Yojana Women Get 3000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत जर २ महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढवतात 'हे' 4 पदार्थ; निरोगी हृदयासाठी कधीच खाऊ नका

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

SCROLL FOR NEXT