Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: एप्रिलचे १५ दिवस उलटले, अजून मार्चचा हप्ता जमा नाही; लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार का?

Ladki Bahin Yojana March April 3000 Rupees Installment May Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, त्याचसोबत आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळण्याची चर्चा सुरु आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मार्चचा हप्ता कधी येणार?

मार्च-एप्रिलचे ₹३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता

एप्रिलचे जवळपास दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्चचाही हप्ता जमा झालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. त्यानंतर आता मार्चचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. दरम्यान, एप्रिलचा हप्ता तरी वेळेवर येणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याचसोबत मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे.

लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार? (Ladki Bahin Yojana Women May Get ₹3000 Installment)

लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर दोन महिन्याचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील. दरम्यान, अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सरकारने दरवेळी फक्त एकच हप्ता दिला आहे. त्यामुळे यावेळी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान,लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करायची आहे. तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. अनेक महिलांनी केवायसी केली आहे. परंतु त्यात काही त्रुटी असल्याने त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. दरम्यान, आता या महिलांना ३० एप्रिलपर्यंत चुका सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे तोपर्यंत महिलांनी हे काम करायचे आहे. हे काम पूर्ण केल्यानंतरच महिलांचा लाभ सुरु राहणार आहे. अन्यथा महिलांना १५०० रुपये मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT