Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्चचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana March-April Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आता दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मार्चचा हप्ता अजून जमा नाही

मार्च-एप्रिलचे पैसे एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मार्चच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मार्च महिना संपून गेला तरीही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यात आता लाडक्या बहि‍णींना मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नदेखील पडला आहे.

लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार? (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेच्या मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर दोन हप्ते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवर जात आहे. मागच्या महिन्यातदेखील फेब्रुवारीचा हप्ता उशिरा आला.त्यावेळीदेखील फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, महिलांना फक्त एकाच महिन्याचे पैसे आहे. यावेळी खरंच महिलांना ३००० रुपये मिळणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल.

या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana Installment May Come on These Date)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील शेवटच्या दोन महिन्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फक्त या लाडक्या बहि‍णींनाच मिळणार पैसे (Only These Women Will Get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाही, ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, केवायसीमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना एक संधी देण्यात आली आहे. त्यांना ३१ एप्रिलपर्यंत केवायसी करायची आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वर्धा भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपकडून पत्रकार परिषद आयोजित

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

Jio Recharge : Jio चा धमाकेदार प्लान! एकाच SIM वर संपूर्ण फॅमिलीला अनलिमिडेट कॉलिंग अन् डेटासह अनेक फायदे

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

SCROLL FOR NEXT