Maharashtra Government Scheme google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Vijay Wadettiwar Statement: लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं. याच मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी महायती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीमध्ये महिलांकडून मत मिळवण्यासाठी या योजनेचा वापर करण्यात आला आहे, पण सत्ता मिळाल्यानंतर सरकारने त्याच महिलांचा विश्वासघात केलाय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला .

विजय वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची आठवण झाली, पण सत्ता मिळताच त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय. 80 लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने स्वत:ची जबाबदारी झटकलीये. या बहिणींचा तळतळाट महायुती सरकारला भविष्यात महाग पडेल." अशा प्रकारची टिका त्यांनी केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर जवळपास 80 लाख महिलांची नावं यादीतून वगळण्यात आली. सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्या महिला योजनेसाठी अपात्र होत्या, ज्यांची अपूर्ण कागदपत्रे होती आणि ज्या महिलांनी ईकेवायसी केली नव्हती. त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळ्यात आलं आहे. तर विरोधकांनी याला महिलांशी केलेला विश्वासघात म्हटलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत उद्योगपती आणि इतर पक्षांमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यावर सुद्धा वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता, पण आज भाजपच काँग्रेसयुक्त झाली आहे. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांना लाभ सुरू राहील. आता मे महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? याबद्दल लाडक्या बहीणींमध्ये चर्चा सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १५ जूनपर्यंत लाडक्या बहीणींना हप्ता मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT