Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

Ladki Bahin Yojana January Installment: लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्यास सुरुवात झालीय. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Bharat Jadhav

  • जानेवारी 2026 चा ₹1500 हप्ता जमा होण्यास सुरुवात.

  • आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली.

  • महिला व बाल विकास विभागाकडून डीबीटीद्वारे रक्कम वर्ग.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास दोन महिन्याची प्रतिक्षा आज संपली. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे दिलासा मिळालाय. महिला व बाल विकास विभागानं हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची वाटचाल यापुढेही अशीच दमदारपणे सुरू राहील असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

आदिती तटकरे यांची पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

दरम्यान १८ फेब्रुवारीला सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला ९८ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती. ही रक्कम महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली.

ई केवायसी दुरुस्तीसाठी संधी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. आता ई चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात येणार नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै २०२४ पासून जानेवारी २०२६ चा हप्ता विचारात घेतल्यास १९ हप्त्यांची रक्कम मिळाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सोन्याच्या किंमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? DA, HRA, पेन्शन आणि एरिअरबाबत मोठा खुलासा

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

पुण्यातील स्टील व्यापाऱ्याला ५ कोटींची खंडणी... अन् बिश्नोई गँगचा गेम उलटला; राजस्थानमधून मुख्य आरोपी गजाआड!

SCROLL FOR NEXT