Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ₹१५०० की ३००० रूपये, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार? जून-जुलै हप्त्याची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana June July installment update : लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता १५ जुलैपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. महिलांच्या खात्यात ₹१,५०० येणार की जून-जुलैचा एकत्रित ₹३,००० हप्ता मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana June July installment Date update : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालय, पण अद्याप १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत अपडेट आलेली नाही. राज्यातील लाखो 'लाडक्या बहिणींचे' लक्ष जून-जुलैच्या हप्त्याकडे लागले आहे. जून महिना संपून नवा आठवडा उजाडला, तरी अजूनही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे आता जूनचा हप्ता कधी येणार आणि तो नेमका किती असणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.

१५ तारखेपर्यंत हप्ता येण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हा हप्ता १५ जुलैपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता १५ मे रोजी, तर मे महिन्याचा हप्ता १५ जून रोजी जमा करण्यात आला होता. याच चक्रानुसार आता जूनचा हप्ताही १५ जुलैच्या आसपास येण्याची दाट शक्यता आहे. त्याला दुसरे एक कारण म्हणजे, राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाते. तसा जीआर काढण्यात आलेला आहे.

८० लाख महिलांना फटका, 'या' महिलांनाच मिळणार लाभ

यावेळच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना यावेळचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती आहे. केवळ १ कोटी ७० लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यातच हा हप्ता जमा केला जाईल. अपात्रता किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

₹१५०० येणार की एकत्र ₹३०००?

सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी चर्चा ही आहे की खात्यात नक्की किती पैसे येणार? सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर निधी मंजूर करून तो डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट महिलांच्या खात्यात वर्ग केला जाईल.

दरम्यान, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र करून एकूण ३,००० रुपये जुलै महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार की फक्त जूनचाच हप्ता १५ तारखेला येणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता सरकार नक्की काय निर्णय घेते, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT