Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० नाही तर आता ३००० मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य चर्चेत

Ladki Bahin Yojana Installment Price Increases: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. आता हाच हप्ता वाढवून ३००० रुपये केला जाऊ शकतो.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांना पैसे मिळाले आहेत तर अजूनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र ३००० रुपये देण्यात आला होता.त्यानंतर आतापर्यंत महिलांना १५०० रुपये हप्ता मिळत होता. यानंतर ही रक्कम वाढवून ३००० करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जर राज्यात महायुती सरकारला महिलांनी पाठिंबा दिला तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता ३००० रुपये केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांना खूप फायदा होणार आहे. (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जर लाडक्या बहि‍णींनी आमच्या सरकारला ताकद, पाठिंबा दिला तर योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरुन २००० केला जाऊ शकतो. कदाचित हप्त्याती रक्कम ३००० रुपयांपर्यंतदेखील वाढवली जाऊ शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरुन ३००० रुपये केला जाऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिंणींना आता ३००० रुपये मिळणार आहे.

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर दिला जात आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात अजित पवारांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देणार असल्याचे सांगितले आहे.(Ladki Bahin Yojana Installment)

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून देण्यास सुरुवात केली आहे. तिसरा हप्ता देताना पहिल्याच दिवशी ५१२ कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबर रोजी दिला जाण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी हा हप्ता दिला जाईल. (Ladki Bahin Yojana Installment Increases 3000 )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT