Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया मिळाला नाही?, तिसरा हफ्ताच्या लाभ मिळणार की नाही? वाचा सविस्तर

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २९ सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेत अजूनपर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या महिलांना किती पैसे मिळणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींना मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. मात्र, ही तारीख सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना या महिन्यात हप्ता मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे आला होता. मात्र, अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नव्हते. त्या महिलांना आता पैसे मिळणार का? सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार याबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना ३ महिन्याचे ४५०० रुपये मिळणार आहेत. तसेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनाही ४५०० रुपये मिळणार आहे. ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे ३००० हजार रुपये आले आहेत त्यांना १५०० रुपये मिळणार आहेत. याआधी ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात.

तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने किंवा तुमचा अर्ज मंजूर न झाल्याने तुम्हाला पैसे मिळाले नसतील. त्याचसोबत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज नीट भरला नसेल तरीही तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला या महिन्याला पैसे मिळतील. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही अशा पद्धतीने करा चेक

लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे आलेत की नाही हे ते घरबसल्या चेक करु शकतात. घरबसल्या तुम्ही तुमच्या बँकिंग अॅपवर पैसे चेक करु शकतात.त्याचसोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करुन पैसे आलेत की नाही हे पाहू शकतात. तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल तर तिथे जाऊन तुम्ही पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT