Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: सरकारचा एक निर्णय, लाडकी बहीण योजनेचे १२,२४० कोटी वाचणार; कारण काय?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अपात्र महिलांचा लाभ बंद केला आहे. यामुळे सरकारचे १२,२४० कोटी रुपये वाचणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

सरकारने १२,२४० कोटी रुपये वाचणार

अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारचे पैसे वाचणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, या योजनेसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतात. या योजनेसाठी मागच्या वर्षी २०२५-२६ साठी ३६००० कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर या वर्षी २६,००० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याचसोबत आता सरकारचे अजून १२,२४० कोटी रुपये वाचणार आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय (Government Big Decision on Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ६८ ते ७१ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेवरील खर्च कमी होणार आहे. वार्षिक खर्च जवळपास ४३,७४० कोटी रुपयांवरुन ३१,५०० कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. सरकारचे १२,२४० कोटींपेक्षा जास्त रुपये वाचणार आहेत.

महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतून ६८ लाख महिलांना वगळल्यामुळे इतर विभागांकडून निधी वळवण्याची गरज भासणार नाही. याआधी सामाजिक न्याय विभागाकडून निधी वळवला जात होता.

लाखो महिलांचा लाभ बंद (Ladki Bahin Yojana 68 Lakh Women Ineligible)

लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरु झाली होती. या योजनेत सुरुवातील २.४७ कोटी महिला लाभार्थी होत्या. त्यानंतर आता फक्त १.७ कोटी महिला लाभ घेतात. यामध्ये अपात्र आणि केवायसी न केलेल्या महिलांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त पात्र महिलांनाच मिळतो. या योजनेत केवायसी करणे अनिवार्य होते. केवायसी न केल्यास महिलांना योजनेतून वगळले गेले आहे. यामुळे ज्या महिला वगळल्या आहेत त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. परिणामी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यामुळेच योजनेचे पैसे वाचणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Dalimb Benefits : उन्हाळ्यात रोज सुपरफ्रूट डाळिंब खल्ल्याने होतात हे ७ आरोग्यवर्धक फायदे

SCROLL FOR NEXT