Ladaki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: वडील आणि पती दोघेही हयात नाहीत, लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ladki Bahin Yojana e KYC Mandatory: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे. ई केवायसी करण्यासाठी वडील आणि पतीचे केवायसीदेखील गरजेचे केले आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसी करणे अनिवार्य

जर पती आणि वडील हयात नसतील तर

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. महिलांना स्वतःची ई केवायसी करायची आहे. त्याचसोबत त्यांचे वडील किंवा पती यांचीही ई केवायसी करायची आहे. जर ही प्रोसेस पूर्ण केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.परंतु जर महिलांच्या पती आणि वडिलांचे दोघांचेही निधन झाले असेल तर काय करावे असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लाडकीच्या केवायसीसाठी मुदत

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदत देण्यात आली आहे. तुम्हाला १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायची आहेत.१८ सप्टेंबरपासून ही केवायसी प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे. दरम्यान, केवायसी प्रोसेस करताना वडिल किंवी पतीचा आधार नंबर घेऊन केवायसी केली जाते.परंतु जर दोघेही व्यक्ती हयात नसतील तर काय करावे यावर एक तोडगा काढण्यात आला आहे.

महिलांची ही अडचण लक्षात घेण्यात आली आहे. दरम्यान, अशा महिलांचा लाभ सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. येत्या काही दिवसात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महिलांच्या ई केवायसीबाबत पुढील काही दिवसात नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी कशी करावी? (Ladki Bahin Yojana eKYC Process)

सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर ई केवायसीवर क्लिक करा.

तुमचा आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

यानंतर तुमचे केवायसी झाले की नाही हे समजेल.

जर केवायसी पूर्ण झाले नसेल तर प्रोसेस सुरु होईल.

यानंतर पती किंवा वडिलांचा आधार नंबर निवडायचा आहे. त्यानंतर ओचीपी येईल.

यानंतर जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे. यानंतर डिक्लेरेशनवर क्लि करा.

यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची माहिती भरा.

यानंतर तुमचे केवायसी पूर्ण झाले आहे, असा मेसेज येईल. त्यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT