Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकीला e-KYC सक्तीची, पण सर्व्हर डाऊनमुळे अडचण, आता काय करणार?

Ladki Bahin Yojana E Kyc Process: लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींसाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य

केवायसी करताना अनेक अडचणी

केवायसी करताना अडचणी आल्यास काय करावे?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी अनेक महिलांनी ई केवायसी केलेदेखील आहे. मात्र, अनेक महिलांना ई केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाइटवर अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे ई केवायसी होत नाहीये. यामुळेच लाडक्या बहिणी सध्या टेन्शनमध्ये आल्या आहेत.

लाडक्या बहि‍णींना केवायसी करताना अडचण (Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वेबसाइटवर अडचणी येत आहे. वेबसाइट लोड होत नाहीये.तसेच फॉर्म भरताना अनेक अडचणी येत आहे. एकतर कागदपत्रे अपलोड होत नाहीये. कागदपत्रे अपलोड झाली तर मोबाईल नंबरवर ओटीपी येण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे केवायसी करणे राहून जात आहेत.

गावाखेड्यातील महिलांना ई केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. फॉर्म ओपन होत नसल्याने त्यांना अनेकदा सायबर कॅफेमध्ये फेऱ्या घालाव्या लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहेत. त्यामुळे महिलांना काय करावे असा प्रश्न पडत आहे.

केवायसी करताना एरर येत असेल तर काय करावे?

लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रोसेस सुरु झाली आहे. केवायसी करताना अनेकदा साइट लोड होत नाही. यामागचे कारण अे की, अनेकजण एकाचवेळी वेबसाइटवर जाऊन केवायसी करत आहे. त्यामुळे साइट लोड होत नाहीये. यामुळे तुम्ही रात्री १२ नंतर किंवा पहाटेच्या सुमारास केवायसी करा जेणेकरुन कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. याचसोबत जर तुम्हाला ओटीपी येत नसेल तर यासाठी नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो.त्यामुळे तुम्हाला काही काळानंतर ओटीपी येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT